Home महत्वाच्या बातम्या अपात्रतेचा निकालानंतर शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

अपात्रतेचा निकालानंतर शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. शिवसेना ही शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाने आक्रोश मोर्चाला सुरुवात केली.

आम्ही सदैव उद्धव ठाकरे यांच्यासोबत असा बॅनर घेऊन कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या कार्यकर्त्याकंडून काळे झेंडे दाखवत विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचा निषेध व्यक्त केला गेला. तर समोरच्या बाजूने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात येतोय. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला जातोय. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली जातेय.

ही बातमी पण वाचा : खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल – आदित्य ठाकरे

दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाली. पण पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवलं जात असून कोणताही गैरप्रकार घडू नये असे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शिंदे सरकार जाणार की राहणार? ‘या’ दिवशी लागणार आमदार अपत्रतेचा निकाल

शाळेत मिळणार अंडी, दीपक केसरकर यांच्या निर्णयास भाजपचा विरोध