Home महाराष्ट्र खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल – आदित्य ठाकरे

खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल – आदित्य ठाकरे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सगळ्या देशाच लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला.

राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिलाअसून त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत मान्यता दिलीय. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर आदित्य ठाकरे यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

“मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे” अशा शब्दात निकालावर संताप व्यक्त केला.

अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते?. लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत, अस असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक. जगाला आता कळलेलं आहे की, आपल्या देशात लोकशाहीला मारलेलं आहे आणि देशात हिटलर शाही सुरू झालेली आहे” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

शिंदे सरकार जाणार की राहणार? ‘या’ दिवशी लागणार आमदार अपत्रतेचा निकाल

शाळेत मिळणार अंडी, दीपक केसरकर यांच्या निर्णयास भाजपचा विरोध

अभिनेते किरण माने यांचा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; प्रवेश करताच म्हणाले…