Home महाराष्ट्र अपेक्षा होती खरा निकाल लागेल मात्र…; अपात्रतेच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

अपेक्षा होती खरा निकाल लागेल मात्र…; अपात्रतेच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. शिवसेना ही शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : अपात्रतेचा निकालानंतर शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उध्दव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी उध्दव ठाकरे यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निकाल काहीही लागला असला, तरी ह्या प्रवृत्तीविषयी आपण मिळुन लढू , असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल – आदित्य ठाकरे

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शिंदे सरकार जाणार की राहणार? ‘या’ दिवशी लागणार आमदार अपत्रतेचा निकाल