आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : भाजप नेते तसेच बिहार सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलेले शहानवाज हुसैन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करा, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना हे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी 3 महिन्यात तपास पूर्ण करण्याच्या सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत. त्यामुळे शहानवाज हुसैन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा : शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात सामील होणार?
दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या बेंचने शहानवाज हुसैन यांच्याविरोधात बलात्कारासह अन्य कलामाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पीडित महिलेने काही वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीनंतर कोर्टाच्या आदेशानंतर आता शहानवाज हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
गद्दार अधिवेशनाला आले, पण ते…; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल
“मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ‘या’ गावातील असंख्य महिला, युवकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
एकनाथ शिंदेंचा मनसेला धक्का; मनसेचा ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश