Home महाराष्ट्र काहीही झालं तरी, अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार; कोल्हापूरच्या ‘या’ माजी आमदाराची...

काहीही झालं तरी, अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार; कोल्हापूरच्या ‘या’ माजी आमदाराची ग्वाही

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.  तर अशातच शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी आपण शिवसेनेसोबत कायम असणार असल्याची ग्वाही दिली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानून गेल्या 18 वर्षांपासून मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यामुळे यापुढे राज्यात कितीही राजकीय घडामोडी घडल्या तरी अखेरच्या श्वासापर्यंत आपण शिवसेनेतच राहणार, अशी ग्वाही सत्यजित पाटील यांनी यावेळी दिली. शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

हे ही वाचा : भाजपच्या ‘या’ नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार, दिल्ली हायकोर्टाचे आदेश

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच तळागाळातील सामान्य शिवसैनिकांना पाठबळ देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांनीही शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकीत गद्दारांना शिवसेनेची ताकद दाखविण्याचे काम आपल्याला करायचे आहे., असंही सत्यजित पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

नागपुरात शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात सामील होणार?

गद्दार अधिवेशनाला आले, पण ते…; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

“मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ‘या’ गावातील असंख्य महिला, युवकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”