शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं, त्यामुळे…; भाजपचा हल्लाबोल

0
279

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलडाणा : नवाब मलिक यांनी दाऊदच्या हस्तकांसोबत जमिनीचा व्यवहार केल्यानंतर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपकडून शिवसेनेवर वारंवार टीका करण्यात येत आहे. त्यातच आता भाजप आमदार श्वेता महाले यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. त्या टीव्ही9 मराठीशी बोलत होत्या.

हे ही वाचा : तुमच्या निष्काळजीपणामुळे बीड जिल्ह्याची बदनामी; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर

हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे. शिवसेनेचं  हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरते राहिलं आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस  बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली. त्यामुळेच काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको, असं भाजप आमदार श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.

ज्या नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले. त्यांनाच वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. हे दुर्देवी आहे. शिवसेनेचं हिंदुत्व निघून गेलं आहे. सध्या शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे, असंही श्वेता महाले म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

आमची तीन चाकं मजबूत, शिवसेनेला MIM ची गरज नाही; अब्दुल सत्तार कडाडले

…ही तर चांगली गोष्ट; राष्ट्रवादी-MIM युतीवरून सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

आमचा एक जरी आमदार फुटला तरी…; जयंत पाटलांचा महाविकास आघाडीच्या आमदारांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here