Home महाराष्ट्र आमची तीन चाकं मजबूत, शिवसेनेला MIM ची गरज नाही; अब्दुल सत्तार कडाडले

आमची तीन चाकं मजबूत, शिवसेनेला MIM ची गरज नाही; अब्दुल सत्तार कडाडले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची काल भेट घेतली. या भेटीवरून चर्चांना उधाण आलं आहे.

या भेटीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली. मात्र शिवसेनेनं हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच, ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं. टोपेंच्या या विधानावरून अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. यावरून आता शिवसेना नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : …ही तर चांगली गोष्ट; राष्ट्रवादी-MIM युतीवरून सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

एमआयएमला सोबत घ्यायचे की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच घेतील. मात्र आमचे तीन चाकं मजबूत आहेत. चौथ्या चाकाची आम्हाला गरज नाही. सध्या शिवसेनेला तरी एमआयएमची गरज नाही, असं सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते बीडमध्ये माध्मयांशी बोलत होते.

दरम्यान, खासदार जलील यांनी आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेनाप्रमुख योग्य तो निर्णय घेतील. जलील यांनी सेनेला नव्हे तर राष्ट्रवादीला ऑफर दिली आहे. संजय राऊत आमचे नेते आहेत. ते म्हणतात ते बरोबर आहे. आमच्या तीन चाकांकडे 173 आमदार आहेत. सध्या आम्हाला चार चाकांची गरज नाही. एमआयएमच्या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आहे. त्यामुळे जलील यांनी त्यांना भेटावे. दोन्ही पक्षांचा निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असेल. सध्या शिवसेनेला एमआयएमची गरज नाही, असंही सत्तार यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

आमचा एक जरी आमदार फुटला तरी…; जयंत पाटलांचा महाविकास आघाडीच्या आमदारांना इशारा

इम्तियाज जलील यांनी MIM चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत यावं- छगन भुजबळ

विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राष्ट्रवादी, मलिकांचा राजीनामा घेत नाही- चंद्रकांत पाटील