Home महाराष्ट्र आमचा एक जरी आमदार फुटला तरी…; जयंत पाटलांचा महाविकास आघाडीच्या आमदारांना इशारा

आमचा एक जरी आमदार फुटला तरी…; जयंत पाटलांचा महाविकास आघाडीच्या आमदारांना इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : निवडणुका लागल्या की, महाविकास आघाडीतील आमदार भाजपमध्ये येतील, असा दावा केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपमध्ये येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं दानवे यांनी यावेळी म्हटलं. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : इम्तियाज जलील यांनी MIM चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत यावं- छगन भुजबळ

आमचे आमदार फुटणार नाहीत. जर कुणी फुटला तर तो पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. लोकंच त्यांना सळो की पळो करुन सोडतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्या आमदाराविरोधात लढू’, असं म्हणत जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना इशारा दिला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून भाजपच्या आमदारांनाही मोठा निधी दिला आहे. फडणवीसांच्या काळातही एवढा निधी मिळाला नसल्याचं भाजपचे आमदार आम्हाला सांगतात, असा दावाही जयंत पाटलांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राष्ट्रवादी, मलिकांचा राजीनामा घेत नाही- चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा गाैफ्यस्फोट

शरद पवार पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे फक्त 54 आमदार; गोपीचंद पडळकरांचा टोला