Home महाराष्ट्र शरद पवार पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे फक्त 54 आमदार; गोपीचंद पडळकरांचा टोला

शरद पवार पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे फक्त 54 आमदार; गोपीचंद पडळकरांचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या आमदारांना मार्गदर्शन करताना यावेळी, भाजपला राज्यात येऊन देणार नाही, पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला पवारांनी या आमदारांना यावेळी दिला. यावरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

विधानसभा निवडणुकीनंतर कुणाची सत्ता येईल याचा विचार शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांनी करू नये, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. शरद पवार यांनी एकच विचार करावा, कुणाच्या पाटीत खंजीर खुपसल्यावर आपण सत्तेत येऊ हे त्यांनी ठरवावं, असंही पडळकरांनी यावेळी म्हटलं. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे…; शिवसेना नेत्याची टीका

दरम्यान, हे सरकार स्थापन झाल्यापासून वारंवार महाविकास आघाडीतील नेते असतील, शरद पवार असतील ते महाराष्ट्रातील जनतेला सांगतात की भाजप सत्तेत येणार नाही. आम्ही पुढील 25 वर्षे सत्तेत राहणार असं ते म्हणतात. मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले. तर, शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. तुम्ही पक्षाची स्थापना केल्यापासून पक्षाचा नेता मुख्यमंत्री करता आला नाही, असा टोला पडळकरांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस यांचं सातत्याने आरोप करणं हे…; शिवसेना नेत्याची टीका

मनसेची अनोखी बॅनरबाजी; शिवसेनेचं अभिनंदन करणारा उलटा बॅनर लावला

महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणारच; देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात निर्धार