Home नागपूर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणारच; देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात निर्धार

महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणारच; देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात निर्धार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : गोव्यातील भाजपच्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात आले. यानंतर आज नागपुरात भाजपच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. विमानतळापासून रेडिसन ब्ल्यू हॉटेलपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

गोव्यात कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपनं संधीचं सोनं केलं. गोव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही प्रचारासाठी आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश बदलतोय. नितीन गडकरींच्या माध्यमातून रस्ते तयार होत आहेत. देशात प्रत्येकाला मोफत कोरोना लसीकरण करण्यात आलंय. वीस हजार लोकांना युक्रेनमधून काढण्यात आलं. हे भाजपप्रती असलेलं विश्वासाचं वातावरण आहे, असं फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : भाजपला राज्यात पुन्हा येऊन देणार नाही; शरद पवारांनी फोडली डरकाळी

दरम्यान, शेवटी बोलताना फडणवीसांनी, गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केला. तसेच महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; मंत्री नवाब मलिक यांच्या खात्यांचा पदभार दुसऱ्या मंत्र्यांना देणार”

गोव्याच्या जनतेनं शिवसेना, राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखविली; नितीन गडकरींची टोलेबाजी

मनसेचा आदी IPL च्या बसेसवर खळखट्याक; आता आदित्य ठाकरेंवर निशाणा