Home महाराष्ट्र …ही तर चांगली गोष्ट; राष्ट्रवादी-MIM युतीवरून सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

…ही तर चांगली गोष्ट; राष्ट्रवादी-MIM युतीवरून सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची काल भेट घेतली. या भेटीवरून चर्चांना उधाण आलं आहे.

उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप राजेश टोपे यांनी या भेटीत ‘एमआयएम’वर केला. यावरून जलील यांनी, हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असं आवाहन केलं. तसेच ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय’ असा खोचक सल्लाही दिला. मात्र शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच, ‘एमआयएम’ला आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं. टोपेंच्या या विधानावरून अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : आमचा एक जरी आमदार फुटला तरी…; जयंत पाटलांचा महाविकास आघाडीच्या आमदारांना इशारा

राजकीय प्रश्नांवर कुणाला एकत्र काम करायचं असेल, समविचारी पक्षांना एकत्र यायचं असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. विकास कामासाठी सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचे भले होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे. कुठल्याही राज्याला ते हवंच आहे, अशी सुचक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

इम्तियाज जलील यांनी MIM चा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत यावं- छगन भुजबळ

विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राष्ट्रवादी, मलिकांचा राजीनामा घेत नाही- चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात; रावसाहेब दानवेंचा गाैफ्यस्फोट