आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी किरीट सोमय्या यानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहत नाही, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी सरकारवर निशाणा साधला.
किरीट सोमय्या यांच्यावर स्थानबद्ध करण्याची कारवाई केली जात आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. सोमय्या हसन मुश्रीफ यांचा दुसरा कथित घोटाळा बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरला जात आहेत. मात्र त्या ठिकणी कलम 144 लावून सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. खरं तर ते देवदर्शन घेऊन कोल्हापूरला जाणार होते. परंतु अशा प्रकारची मुस्कटदाबी सरकारने करायला नको होती, असं दरेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही; सोमय्या यांच्या नोटीसवरून चंद्रकांत पाटलांची टीका
किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध! देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
सेना-भाजप युतीवर केंद्रीय मंत्री डाॅ.भागवत कराड यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
“…म्हणून किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री”