Home महाराष्ट्र “मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो; उद्धव ठाकरेंकडून नीरज चोप्राच्या...

“मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो; उद्धव ठाकरेंकडून नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना फोन

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कुटुंबाने एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली.

हरियाणातील खांदरा हे नीरज चोप्राचं मूळ गाव आहे. उद्धव ठाकरेंनी पीएमार्फत नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नीरज चोप्राचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केलं जाणार आहे. मुंबईत त्याचं भव्य स्वागत होणार आहे अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

दरम्यान,“मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो” असंही उद्धव ठाकरे म्हणाल्याचं सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो”

“…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार”

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दिल्लीत गुप्तबैठक; दानवेंच्या घरी होणारखलबतं, राजकीय चर्चांना उधाण

“हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे”