Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण ऐकत नाहीत- नवाब मलिक

महाराष्ट्रातील भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण ऐकत नाहीत- नवाब मलिक

मुंबई : राज्यात कोरोनामुळे निर्बंध घातलेले असताना महाराष्ट्रातील भाजपने ते निर्बंध खुले करण्यासाठी आंदोलन केलं होतं. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण ऐकत नसल्याचा टोला नवाब मलिक यांनी यावेळी लगावला आहे.

पंतप्रधान मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्यानं काळजीत पडले आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते लोकल सेवा लवकरात लवकर चालू करावी आणि धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करत असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तसं अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र तरीही भाजप नेते आंदोलन करत आहेत, असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द; भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना अनिर्णीत”

“मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो; उद्धव ठाकरेंकडून नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना फोन

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो”

“…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार”