मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचा ठाकरे सरकारशी काहीही संबंध नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबई पोलिस कुणावर अन्याय करत नाहीत, कुणावर सूड उगवत नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, अन्वेय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असं संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक”
डेव्हिड वाॅर्नर-वृद्धिमान साहाची नाबाद शतकी पार्टनरशिप; हैदराबादचा मुंबईवर 10 विकेट्सनी विजय
सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार- नारायण राणे