Home महाराष्ट्र अजित पवार यांची शरद पवारांवर पहिल्यांदाच टीका; म्हणाले, तुम्ही…

अजित पवार यांची शरद पवारांवर पहिल्यांदाच टीका; म्हणाले, तुम्ही…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच टीकास्त्र सोडलं आहे.अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा आज मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

आता 83 वर्ष झालं आहे. आता तुम्ही थांबा. आराम करा. आता तुम्ही थांबणार आहात की नाही? असा सवाल करत तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

ही बातमी पण वाचा : पुन्हा राजकारणात मोठं काहीतरी घडणार?; एकनाथ शिंदे तडकाफडकी मुंबईच्या दिशेला रवाना

तुम्ही राजीनामा दिला होता तर मागे घेतलाच कशाला? असा सवालही अजित पवारांनी यावेळी शरद पवार यांना केला.

सर्वच क्षेत्रात निवृत्तीचं वय ठरलं आहे. सर्वच लोक निवृत्त होत असतात. पण तुम्ही अजूनही निवृत्त होण्याचं नाव घेत नाही. तुम्ही आता निवृत्त व्हा. आराम करा. आम्हाला मार्गदर्शन करा. काही चुकलं तर आमचे कान पकडा. आम्ही दुरुस्त करू ना? पण तुम्ही अध्यक्षपदी अजूनही आहात. का हे केलं जातं? कशासाठी केलं जातं?आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का?, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याला बीसीसीआयने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी”

“मी, शरद पवार साहेबांसोबतच; अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ‘या’ आमदाराचा निर्णय”

“एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती”