Home महाराष्ट्र “मी, शरद पवार साहेबांसोबतच; अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ‘या’ आमदाराचा...

“मी, शरद पवार साहेबांसोबतच; अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ‘या’ आमदाराचा निर्णय”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

यावेळी आमदार मकरंद पाटील हे अजित पवार यांच्याबरोबर असल्याची माहिती समाजमाध्यमांवर व बातम्यांमध्ये येत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावरून आता मकरंद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय आमदार मकरंद पाटील यांनी घेतला आहे. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आज त्यांनी किसनवीर कारखान्यावर वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

ही बातमी पण वाचा : दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे, पण…; सुषमा अंधारेंचं मोठं विधान

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना, मकरंद पाटील यांनी, मुंबईत ‘त्या’ दिवशी मुंबईमध्ये घडलेला घटनाक्रम सविस्तर सांगितला.

किसनवीर कारखान्याच्या कामासंदर्भात शनिवारी अजित पवार यांच्या निवासस्थानी मी व नितीन पाटील चर्चेला गेलो होतो. त्यावेळी मंत्रिमंडळ शपथविधी किंवा भाजपा सरकारला पाठिंबा देणे हा विषय चर्चेमध्ये नव्हता. यावेळी आमच्यासोबत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी दहा वाजता आमचे पुन्हा भेटण्याचे ठरले होते. रविवारी सकाळी आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो तेव्हा त्यावेळी तिथे माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावेळी मंत्र्यांच्या शपथविधीची नावे राज्यपालांना कळविताना पहिल्या यादीमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घ्यायची असल्याचे मला सांगण्यात आले. मात्र मी माझ्या कुटुंबाशी, कार्यकर्त्यांशी व मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा केलेली नव्हती, त्यामुळे मी असा निर्णय घेऊ शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं, असं मकरंद पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लक्ष्मणराव पाटील शरद पवार यांच्यासोबत होते. आमच्या कुटुंबावर शरद पवारांनी भरभरून प्रेम केले व ताकद दिली आहे. सातारा जिल्ह्याचे राजकारण हे यशवंत विचारांचे राजकारण असून या विचारांपासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं मकरंद पाटील यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती”

राजकारणात भूकंप नसून पवारांनी घडवून आणलेली स्क्रिप्ट; राष्ट्रवादीमध्ये २३ वर्षे राहिलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

” ‘या’ गोष्टीसाठी, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांनी केला पवारांचा विश्वासघात