Home महाराष्ट्र शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाणार, कारण…; भाजपच्या ‘या’ खासदाराचा मोठा दावा

शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाणार, कारण…; भाजपच्या ‘या’ खासदाराचा मोठा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

आज अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. अशातच एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विशेष म्हणजे भाजप खासदारानेच ही शक्यता वर्तविली आहे.

ही बातमी पण वाचा : पुन्हा राजकारणात मोठं काहीतरी घडणार?; एकनाथ शिंदे तडकाफडकी मुंबईच्या दिशेला रवाना

खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विट करत ही शक्यता वर्तविली आहे. गेल्या वर्षभरापासून एकमेकांवर टोकाला जाऊन टीका करणारे शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या कानावर ही बाब पडल्याचं सुब्रहमण्यम स्वामींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“मी मुंबईत आहे. शिवसेनेतील बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात. कारण मोदींनी आधी त्यांचा वापर करून घेतला आणि नंतर त्यांना बाजूला सारून आता राष्ट्रवादी काँग्रेसला चुचकारण्याचा प्रयत्न केला जात आहे या गोष्टीमुळे ते अस्वस्थ झाले आहेत, असं मी ऐकलं”, असं सुब्रह्मण्यम स्वामींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याला बीसीसीआयने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी”

दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे, पण…; सुषमा अंधारेंचं मोठं विधान

“एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती”