Home महत्वाच्या बातम्या अजित पवार यांच्यासोबत युतीनंतर भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर

अजित पवार यांच्यासोबत युतीनंतर भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत युती केली. अजित पवारांसह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यानंतर पुणे जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी समोर आली आहे.

पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर नाराजी व्यक्त करत सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात असलेले 5 प्रश्न उपस्थित केले आहेत.

राष्ट्रवादीसोबत युती केल्यानंतर जुन्या, निष्ठावान सामान्य भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असुरक्षितपणाची भावना असल्याचं नवनाथ पारखी यांनी मनातली खदखद व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : अजित पवार यांची शरद पवारांवर पहिल्यांदाच टीका; म्हणाले, तुम्ही…

नवनाथ पारखी यांनी उपस्थित केलेले 5 प्रश्न :

१) अजित पवार आणि त्यांच्या सहयोगी यांना सत्तेत सामावून घेऊन राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढेल का भाजपची?

२) आमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांचे वाली आपण आहात, मग आम्हाला ताकद देणं हे आपलं काम नाही का?

३) वेळ पडेल तेव्हा जेवणाची शिदोरी सोबत घेऊन आम्ही पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला आहे. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचं संघटनेत महत्त्व काय?

४) मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात निष्ठावान कारकर्त्यांची तर जिरवणार नाही ना?

५) भाजपच्या मंत्री पदाच्या शर्यतीतील सहयोगी आमदार नेत्यांचे कायं? ज्यांनी आजवर पक्षासाठी खूप काही केलंय.

दरम्यान, नवनाथ पारखी यांचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचे बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाणार, कारण…; भाजपच्या ‘या’ खासदाराचा मोठा दावा

“मी, शरद पवार साहेबांसोबतच; अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ‘या’ आमदाराचा निर्णय”

दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे, पण…; सुषमा अंधारेंचं मोठं विधान