“मोठी बातमी! संभाजी भिडेंचा खून करणार; माजी राज्यमंत्र्यांचा इशारा, फडणवीसांना लिहिलं पत्र”

0
8

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. परंतु, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी बोलताना केलं होतं.

संभाजी भिडेंच्या या विधानाचे राज्यात जोरदार पडसाद उमटले आहेत. राज्यभरात संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. तर सोलापुरात संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी आज दुग्धाभिषेक आंदोलन पुकारलं होतं. पण भिडे यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या सर्व घडामोडी घ़डत असताना, आता संभाजी भिडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : याचा अर्थ, फडणवीसांनी मान्य केलं की, संभाजी भिडेंना त्यांनीच…; भास्कर जाधवांचं वक्तव्य चर्चेत

माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. भिडे गुरुजींना अटक करा. अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल, अशी धमकी सुबोध सावजी यांनी दिली आहे. सुबोध सावजी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे आपण संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णीचा खून करणार असल्याचं” माजी मंत्री सुबोध सावजी यांनी सांगितलं आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडेला अटक करून कारवाई करा, अन्यथा राज्यातील जनतेच्या वतीने मी भिडेचा खून करेल आणि त्याला गृहमंत्री जबाबदार असतील, असंही पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

धक्कादायक ! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

“मराठीमध्ये व्हिडिओ रिल्स बनविणाऱ्यांना, राज ठाकरेंनी दिली ‘ही’ जबाबदारी”

मंचावर एकत्र असूनही शरद पवारांशी हातमिळवणी न करता का निघून गेलात?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here