Home मनोरंजन धक्कादायक ! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

धक्कादायक ! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

281

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.ते ५८ वर्षांचे होते.

नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

ही बातमी पण वाचा : “मराठीमध्ये व्हिडिओ रिल्स बनविणाऱ्यांना, राज ठाकरेंनी दिली ‘ही’ जबाबदारी”

नितीन देसाई यांनी राजा शिवछत्रपती या स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी मालिकेची निर्मिती केली होती. त्यात डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका होती.

नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.

दरम्यान, नितीन देसाई यांची अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती.

महत्त्वाच्या घडामोडी –

मंचावर एकत्र असूनही शरद पवारांशी हातमिळवणी न करता का निघून गेलात?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

संभाजी भिडेंना बेड्या ठोका, 6 महिने देशाच्या बाहेर ठेवा; सत्ताधारी पक्षातील आमदाराची संतप्त प्रतिक्रिया

मी तुझ्यासारखा हमाल किंवा भंगार विकणारा नाही; एकनाथ खडसे भाजप आमदारावर भडकले