Home महत्वाच्या बातम्या राज ठाकरे देणार भाजप उमेदवाराला पाठींबा?; भेटीगाठींचा ‘राज’कीय अर्थ काय?

राज ठाकरे देणार भाजप उमेदवाराला पाठींबा?; भेटीगाठींचा ‘राज’कीय अर्थ काय?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीला कालपासून सुरुवात झाली असून उद्धव ठाकरे  गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर कालपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर  अंधेरीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत.

हे ही वाचा : भाजपकडून काँग्रेसला मोठं खिंडार; ‘या’ नेत्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांची भेट घेतली. त्यामुळे अंधेरीचा गेम राज ठाकरे पालटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे भाजपला आतून पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मनसे भाजपच्या उमेदवारापाठी असल्याचे सूचक संकेतही राज यांच्याकडून दिले जात असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व; काटोल,नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंचा राजकीय गेम केला; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचा धक्कादायक आरोप

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटं खलबतं; चर्चांना उधाण”