Home महाराष्ट्र “केसीआर यांचा झाला मोठा राजकीय गेम, महाराष्ट्रात दिमाखदार एंट्री, मात्र तेलंगनामध्ये मोठा...

“केसीआर यांचा झाला मोठा राजकीय गेम, महाराष्ट्रात दिमाखदार एंट्री, मात्र तेलंगनामध्ये मोठा उलटफेर”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरअसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

केसीआर यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर तसेच पोस्टर्स झळकविण्यात येत आहेत. केसीआर यांच्या स्वागतासाठी ‘अब की बार, किसान सरकार’ असे बॅनर झळकत आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्र येणार असून या निमित्ताने ते महाराष्ट्रात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. मात्र आता केसीआर यांना तेलंगनामध्येच जोरदार धक्का मिळाला आहे.

ही बातमी पण वाचा : संभाजी भिडे यांची पुन्हा जीभ घसरली; केली थेट काँग्रेसवर टीका, म्हणाले ‘हा’ तर…

केसीआर यांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असताना त्यांच्या बीआरएस पक्षाचे अनेक मोठे नेते, माजी मंत्री, खासदार, आमदारांसह २० हून अधिक महत्वाचे पदाधिकारी, आज दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे केसीआर यांना मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

आम्ही भाजपसोबत आहोत, मात्र…; महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा

विरोधी पक्षनेतेपद का नकोय?; अखेर अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले, अरे बाबा…

“एकनाथ खडसेंची घेतलेली भेट यशस्वी ठरली?; पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार?; ‘या’ मोठ्या नेत्याच्या विधानाने खळबळ”