आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत मिळून शिवसेनेत बंड केले. यानंतर अनेकांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची साथ सोडली. अशातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार आहे.
शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुखपदावर असणाऱ्या राजेश वानखडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचं निश्चित केलं आहे. वानखडे शिंदे गटात प्रवेश न घेता ते भाजपच्या वाटेवर जाणार असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा : शिवसेना-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या वादात बच्चू कडूंची उडी, म्हणाले…
वानखडे यांना आतापर्यंत एक कट्टर शिवसैनिक व मातोश्रीशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते मानले जात होतं.
दरम्यान, राजकीय परिस्थिती पाहून वानखडे यांनी आपली भूमिका बदलण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.
महत्त्वाच्या घडामोडी –
दु:खद बातमी! मनसे परभणी शहर अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात त्यांची प्राणज्योत मालवली”
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित लढण्याची शक्यता; तर काँग्रेस…