Home पुणे मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : “परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली म्हणून मी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलो”

आता रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी कलम 160 अंतर्गत देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावली असून त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी गुन्हा दाखल होताच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या.

महत्वाच्या घडामोडी –

आरोप सिद्ध झाल्याशिवाय, नवाब मलिकांचा राजीनामा नाही; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

संजय राऊतांनी दिला राज ठाकरेंना सल्ला; आता राज ठाकरे म्हणतात…

मुंबईत कपलने सर्वांसमोर केलं खुल्लम खुल्ला किसींग, पहा व्हिडिओ