आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
‘यापूर्वी आपल्यासोबत असलेले आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. जे रोज उठून सावरकरांचा अपमान करतात. अरे निर्लज्जांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जे सावरकरांचं नाव घेत होते’ असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला.
हे ही वाचा : ठाण्यात 2 दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का; नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे महापालिकेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महापालिका इमारतीशेजारी नवे कार्यालय उभारले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, हे शक्तिप्रदर्शन आहे का? मी म्हणालो, हे कार्यकर्ते उत्साहाने आले आहेत. आम्हांला शक्तीप्रदर्शन करायचेच असेल तर पुण्यातील एकही मैदान रिकामे राहणार नाही. पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा फडकेल. मला अलिकडच्या काळात भाजपचा भगवा सांगावा लागतो. ज्यांना भगव्याचा मान नाही, त्यांना हिंदुत्ववादी म्हणून घ्यायची लाज वाटते, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवला.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीची मोठी खेळी; औरंगाबाद शहर-जिल्हाध्यक्षपदासाठी ‘या’ मुस्लिम चेहऱ्याला संधी
नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून नारायण राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा
पुण्यात पुन्हा भाजपचा भगवा फडकणार; देवेंद्र फडणवीसांचा दावा