Home महाराष्ट्र “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या उपाध्यक्षपदी धनंजय पाटील यांची निवड”

“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या उपाध्यक्षपदी धनंजय पाटील यांची निवड”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भिलवडी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भिलवडी ता.पलूस येथील धनंजय संपतराव पाटील यांची निवड करण्यात आली.

हे ही वाचा : “सांगली जिल्हा बँक निवडणूक निकाल; शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी”

पर्यावरण विभागातर्फे पर्यावरण संवर्धनाचे प्रभावीपणे काम करण्याची तसेच काँग्रेस पक्ष बळकट करण्याची जबाबदारी धनंजय पाटील यांच्यावरती सोपविण्यात आली. तसेच सदर निवडीचे अधिकृत नियुक्ती पत्र काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते पलुस येथे धनंजय पाटील यांना सन्मानपूर्वक देण्यात आलं. यावेळी विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. प्रत्येकाने पर्यावरणाची चळवळ अंगीकृत करून घेतली पाहिजे. या सर्व गोष्टी बघितल्यावर मनाला खूप वेदना होतात. तसेच येणाऱ्या पिढीला आपण आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार देणार आहे की नाही?, याचं सर्वांनी भान ठेवून सर्वांनी या चळवळीत सामील व्हावं, असं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे विद्यमान उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगली जिल्हा बँक निवडणूक निकाल; शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी”

शिवसेनेचा भाजप मनसेला मोठा धक्का; भाजपचे तीन नगरसेवक तर मनसेचे कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश

“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, तसेच पुन्हा आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे”