Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, तसेच पुन्हा आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे”

“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, तसेच पुन्हा आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे सरकारने दोन वर्षांत मराठा समाजाची कशी फसवणूक केली याची माहिती देण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत पार पाडली. यावेळी बोलताना, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा : नवीन वर्षात भाजपची सत्ता येणार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केलं आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केलं पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकरांनी यावेळी केली.

ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत., असंही दरेकर म्हणाले.

दरम्यान, या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्यायाधीश भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार, पावले टाकलेली नाहीत. हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते., अशी टीकाही दरेकरांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“नागपुरातही मनसेचा झंझावात, अनेकांनी हाती धरला मनसेचा झेंडा”

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांवर भाजपा आमदारांनी व्यक्त केली खंत

‘नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं’; एकनाथ खडसेंचा निशाणा