Home महत्वाच्या बातम्या शिवसेनेचा भाजप मनसेला मोठा धक्का; भाजपचे तीन नगरसेवक तर मनसेचे कार्यकर्त्यांचा सेनेत...

शिवसेनेचा भाजप मनसेला मोठा धक्का; भाजपचे तीन नगरसेवक तर मनसेचे कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने भाजपसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का दिला आहे. केडीएमसीत सत्ता आणण्यासाठी भाजपने मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच शिवसेनेने भाजपला  आणि मनसेला अनपेक्षित असा मोठा दणका दिला आहे.

हे ही वाचा : “ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, तसेच पुन्हा आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे”

पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे मनसे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपच्या ‘मिशन लोटस’ला आता शिवसेनेकडून ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ने उत्तर देण्यात आलं आहे. भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज संध्याकाळी पार पडला. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. महेश पाटील, सुनिता पाटील आणि सायली विचारे या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नवीन वर्षात भाजपची सत्ता येणार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“नागपुरातही मनसेचा झंझावात, अनेकांनी हाती धरला मनसेचा झेंडा”

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांवर भाजपा आमदारांनी व्यक्त केली खंत