Home महाराष्ट्र “सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक निकाल; शशिकांत शिंदे-शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का”

“सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक निकाल; शशिकांत शिंदे-शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यामध्ये शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे विजयी झाले आहेत.

हे ही वाचा : शिवसेनेचा भाजप मनसेला मोठा धक्का; भाजपचे तीन नगरसेवक तर मनसेचे कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश

जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून काँग्रेसचे विलासकाका उंडाळकर यांचे उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, तसेच पुन्हा आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे”

नवीन वर्षात भाजपची सत्ता येणार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“नागपुरातही मनसेचा झंझावात, अनेकांनी हाती धरला मनसेचा झेंडा”