Home महाराष्ट्र “माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण”

“माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण”

267

मुंबई : मुंबईतील कांदिवलीमध्ये 5 ते 6 शिवसैनिकांनी एका माजी नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. मदन शर्मा असं संबंधित माजी नौदल अधिकाऱ्याचं नाव आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आक्षेपार्य व्हिडीओ / कार्टुन व्हाट्सअॅवर फॉरवर्ड केल्यानं मला शिवसैनिकांनी मारहाण केली, असं मदन शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मारहाण केलेल्या 5 ते 6 शिवसैनिकांपैकी 2 माजी शाखाप्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. घडलेल्या प्रकारानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा…; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

हे सरकार विसरलं करोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही; निलेश राणेंची राज्यसरकारवर टीका

…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापी माफ करणार नाही; मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

माझ्या शिष्टाईमुळेच शिवसेना व कंगणामधला वाद मिटला- रामदास आठवले