Home महाराष्ट्र माझ्या शिष्टाईमुळेच शिवसेना व कंगणामधला वाद मिटला- रामदास आठवले

माझ्या शिष्टाईमुळेच शिवसेना व कंगणामधला वाद मिटला- रामदास आठवले

मुंबई : गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना रणाैतची भेट घेण्याचा निर्णय घेतला. कंगनाच्या राहत्या घरी खार इथे त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

तुम्ही कंगना रणौतला राजकारणात येण्याची ऑफर दिलीत का, असा प्रश्न रामदास आठवले यांना विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवले यांनी म्हटले की, होय मी कंगनाला राजकारणात येण्याविषयी विचारले. तुला राजकारणात यायचे असल्यास आरपीआय किंवा भाजपमध्ये तुझे स्वागत आहे, हेदेखील मी तिला सांगितले, असं रामदास आठवलं म्हणाले. तसेच माझ्या शिष्टाईमुळेच शिवसेना व कंगणामधला वाद मिटला, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मात्र सध्यातरी आपला राजकारणात येण्याचा कोणताही इरादा नाही. मला सध्या चित्रपटसृष्टीतच काम करायचे आहे, असे कंगना रणौत हिने सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; एका व्यक्तीस अटक

“विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण”

“मराठा आरक्षणावरून परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी “

माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही; खडसेंच्या टीकेला फडणवीसांचा प्रत्युत्तर