Home महाराष्ट्र “मराठा आरक्षणावरून परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी “

“मराठा आरक्षणावरून परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी “

परभणी : मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. तसेच मराठा आरक्षणाचा विषय घटना पिठाकडे गेल्यानंतर संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होत असतांना याकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा घटना पिठाकडे गेला, अशी टीका संभाजी ब्रिग्रेडने केली आहे.

दरम्यान, परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काहींना आपले प्राण गमवावे लागले. विविध संघटना आणि मराठा समाजाने हजारो उपोषणे केली, असं असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही संभाजी ब्रिगेडने केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही; खडसेंच्या टीकेला फडणवीसांचा प्रत्युत्तर

अभिनेत्री कंगना रणाैतची ड्रग्स प्रकरणी चौकशी होणार?; ठाकरे सरकारचं मुंबई पोलिसांना पत्र

ही बाळासाहेबांची शिवसेना नाहीच आहे, ज्या शिवसेनेला आम्ही लहानपणापासून बघत आलोय; कंगणाच्या आईची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…