Home क्रीडा “WPL Auction 2023! सांगलीची स्मृती मानधना RCB च्या ताफ्यात, स्मृतीसाठी RCB ने...

“WPL Auction 2023! सांगलीची स्मृती मानधना RCB च्या ताफ्यात, स्मृतीसाठी RCB ने मोजले ‘तब्बल’ इतके कोटी”

359

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया सुरू आहे. यात भारतीय क्रिकेटर स्मृती मानधनाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 3.40 कोटी रुपयांना खरेदी केलं.

लिलावाची सुरुवात स्मृतीपासून झाली. सांगलीच्या स्मृती मानधनला, मुंबईने पहिल्यांदा बोली लावली, मात्र आरसीबीने बाजी मारत स्मृतीला आपल्या ताफ्यात सामील केलं. त्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला 1.80 कोटी रुपये मोजून मुंबई इंडियन्सने संघात घेतलं. तर ऑस्ट्रेलियाच्या एश्ले गार्डनरला गुजरात जायंट्सने 3.20 कोटी रुपयांना संघात घेतलं.

हे ही वाचा : “Womens T-20 WC! मुंबईकर जेमिमाहची मॅच विनिंग खेळी, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय”

दरम्यान, ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटर एश्ले गार्डनरसाठी मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरिअर्स यांच्यात जोरदार चढाओढ बघायला मिळाली. अखेर गुजरातने बाजी मारत 3.20 कोटी मोजून तिला खरेदी केलं. तर न्यूझीलंडच्या सोफी डिवाइनला आरसीबीने बेस प्राइज 50 लाखात घेतलं. तसेच टीम इंडियाची स्टार गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरला आरसीबीने 1.60 कोटी रूपयांना विकत घेतलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“ठाण्यात भाजपचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर