Home महाराष्ट्र मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर

मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर

175

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले आदी महापुरुषांचा अवमान केल्यामुळे राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने चीड व्यक्त करत राज्यपालांचे पुतळे जाळले होते.ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलनेही होत होती. त्यामुळे राज्यपालांना अखेर पायउतार व्हावं लागलं आहे.

दरम्यान, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आठ त्यांची जीभ घसरली होती. लग्न झालं तेव्हा महात्मा फुले 12 वर्षाचे होते. सावित्रीबाई फुले 10 वर्षाच्या होत्या. लग्न झाल्यावर या वयातील मुले पुढे काय करतात? असं विधान त्यांनी केलं होतं. विकट हास्य करत राज्यपाल कोश्यारी यांनी हे विधान केलं होतं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…तर भाज पक्षाची अवस्था काँग्रेससारखी होईल”

“मोठी बातमी! राज ठाकरे- भाजपची युती होण्याची दाट शक्यता”

राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं घेतली देवेंद्र फडणवीसांची गुप्त बैठक, चर्चांना उधाण”