Home नाशिक “मोठी बातमी! राज ठाकरे- भाजपची युती होण्याची दाट शक्यता”

“मोठी बातमी! राज ठाकरे- भाजपची युती होण्याची दाट शक्यता”

462

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप-मनसे युतीबाबत सूचक विधान केलं आहे.

राज ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, असं मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी केलं. तसेच राज ठाकरेंना वाटेल तेव्हा ते भाजपसोबत युती करु शकतात, असं सूचक विधान बावनकुळेंनी यावेळी केलं.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं घेतली देवेंद्र फडणवीसांची गुप्त बैठक, चर्चांना उधाण”

मनात एक ठेवायचं आणि बोलायचं वेगळं असे राज ठाकरे नाहीत. कपट कारस्थान करणारे राज ठाकरे नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यावर आमचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. पण त्यांच्या मनात भाजपसोबत यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी नेहमी दरवाजे खुले आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

16 आमदार अपात्र ठरले तरी…; अजित पवारांचं मोठं विधान

“उद्धवभाऊ, मुख्यमंत्री असताना राज ठाकरे मैदानात उतरले, आता काय झालं?”

“मोठी बातमी! काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; बाळासाहेब थोरातांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा”