Home अमरावती “उद्धवभाऊ, मुख्यमंत्री असताना राज ठाकरे मैदानात उतरले, आता काय झालं?”

“उद्धवभाऊ, मुख्यमंत्री असताना राज ठाकरे मैदानात उतरले, आता काय झालं?”

600

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी या विषयाची चर्चा बंद झाली. यावरून आता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धवभाऊ जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी अजानच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी रान पेटवले होते. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर त्यांना काय झाले?, असा उपरोधक सवाल प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरेंना यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “मोठी बातमी! काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; बाळासाहेब थोरातांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा”

अजान आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंना विचारा काय झाले त्याचे? आता त्यांच्या मित्रांचे सरकार स्थापन झाले आहे, त्यांना विचारा की कधी आंदोलन करून अजान आणि भोंगे बंद पाडणार आहात? असा प्रश्नही तोगडिया यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज ठाकरेंनी आंदोलन केलं तर मी त्यांच्यासोबत असेन, असं आवाहनही तोगडिया यांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

आदित्य ठाकरेंची, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, म्हणाले…

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं राज ठाकरेंनी केलं आवाहन