Home क्रीडा “Womens T-20 WC! मुंबईकर जेमिमाहची मॅच विनिंग खेळी, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय”

“Womens T-20 WC! मुंबईकर जेमिमाहची मॅच विनिंग खेळी, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय”

216

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

केपटाऊन : महिला टी 20 वर्ल्ड कपला सूरूवात झाली असून भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. जेमिमाह रॉड्रीग्जच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 7 विकेट राखून पराभव केला.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट गमावत 149 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बिस्माह मारूफने सर्वाधिक नाबाद 55 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली. तर आयेशा नसीमनेही मारूफला साथ देत 25 चेंडूत 43 धावांची नाबाद खेळी केली. मारूफ-आयेशा जोडीने 81 धावांची नाबाद भागीदारी करत पाकिस्तानला 149 धावासंख्येपर्यंत पोहचविले.

हे ही वाचा : भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पाकिस्तानने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. भारताच्या यास्तिका भाटिया व शेफाली वर्मा जोडीने 38 धावांची भागिदारी केली. मात्र यास्तिका भाटियाला बाद करून सादिया इक्बालने जोडी फोडली. त्यानंतर नसरा संधूने शेफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना बाद केलं. शेफालीने 25 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावा केल्या. तर हरमनप्रीत कौर 12 चेंडूत 16 धावा काढून बाद झाली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर जेमिमाह रॉड्रीग्जने, विकेटकीपर फलंदाज रिचा घोषच्या साथीत आणखी पडझड न होता भारताला विजय मिळवून दिला. रॉड्रीग्जने 38 चेंडूत 8 चाैकारांसह नाबाद 53 धावांची खेळी केला. तर रिचा घोषने 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. दोघींनी नाबाद 58 धावांची भागीदारी करत भारताला 19 व्या षटकातच विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाण्यात भाजपचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश