“वर्ल्ड कप आधीच टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर?”

0
337

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिज व आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

ही वनडे वर्ल्ड कप स्पर्धा 8 ऑक्टोबरपासून सूरू होणार असून त्याआधीच टीम इंडियाला वर्ल्ड कपआधी मोठा धक्का लागला आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांनी भाजप-राष्ट्रवादीच्या संभाव्य सरकारचे पालकमंत्रीही ठरवले होते; भाजपच्या आणखी एका नेत्याचा दावा

केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह आशिया कप स्पर्धेत कमबॅक करण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर हा देखील कमबॅकसाठी जोरदार तयारी करतोय. मात्र श्रेयस अय्यर याची दुखापत टीम मॅनेजमेंटसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

श्रेयस अय्यर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फिट होणार की नाही, याबबतची चिंता बीसीसीआयच्या मेडिकल टीमला सतावतेय. यामुळेच सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन या दोघांना वनडे फॉर्मेटमध्ये संधी देण्यात येत आहे. हे दोघेही श्रेयसची जागा घेऊ शकतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रेयसच्या पाठीची शस्त्रक्रिया पार पडली. आता श्रेयस बंगळुरुतील एनसीएत दुखापतीतून कमबॅक करण्यासाठी तयारी करतोय.

महत्त्वाच्या घडामोडी –

अनेक राज्यांमध्ये भाजपचं…; शरद पवार यांची भाजपवर टीका

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…त्यामुळे फडणवीस…

पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, शरद पवारांनी आमचा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here