Home पुणे अनेक राज्यांमध्ये भाजपचं…; शरद पवार यांची भाजपवर टीका

अनेक राज्यांमध्ये भाजपचं…; शरद पवार यांची भाजपवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

आता इथून पुढे एका वर्षात देशाच्या लोकसभेच्या निवडणुका येतील. त्याआधी काही राज्यांच्या निवडणुका आहे. पण कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये आपण पाहिलं. भाजप पक्ष यांचा लोकमताचा पाठिंबा राज्य पातळीवर काय आहे हे पाहण्याची गरज आहे. त्यामध्ये तुम्ही देशाचा नकाशा तुमच्यासमोर ठेवा. अनेक राज्यांमध्ये भाजपचं राज्य नाही, असं शरद पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…त्यामुळे फडणवीस…

गोवामध्ये काँग्रेसचं बहुमत होतं. त्यांची सत्ता होती. पण त्यांचे काही आमदार फोडले आणि ते भाजपात गेले. त्यामुळे तिथे सत्ता आली. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथांच्या नेतृत्वात सरकार होतं. पण तिथले काही आमदार फोडले आणि त्याठिकाणी राज्य आणलं, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

महाराष्ट्रात काय केलं ते मी वेगळं सांगत नाही. याचा अर्थ असा आहे, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम आणि मणिपूर. मणिपूर गेल्या ४५ दिवसांपासून वाईट अवस्था आहे. हे सगळं राज्यांची परिस्थिती हेच सांगतेय की, भाजप ही राज्य सांभाळू शकत नाही. त्यामुळे उद्या निवडणुकांचा निर्णय काय होईल. याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधानांनी अशोभनीय वक्तव्य केलं, असा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, शरद पवारांनी आमचा…

‘या’ निवडणूकीत काँग्रेसच्या मदतीने भाजप नेत्याने भाजपला केलं पराभूत, नेमकी खलबतं काय?

…अन् दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ‘ती’ चूक मान्य केली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा