Home महाराष्ट्र पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, शरद पवारांनी आमचा…

पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, शरद पवारांनी आमचा…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर पहाटे शपथविधी घेतला होता, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे.

शरद पवारांची ‘मिस्ट्री’ समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची ‘हिट्री’ समजून घ्यायला हवी. तरच ही ‘मिस्ट्री’ कळेल. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं. ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, एनसीपी भाजपाबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : ‘या’ निवडणूकीत काँग्रेसच्या मदतीने भाजप नेत्याने भाजपला केलं पराभूत, नेमकी खलबतं काय?

आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-एनसीपीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली, असा मोठा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.

आमचा शपथविधी व्हायच्या तीन-चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

…अन् दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ‘ती’ चूक मान्य केली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

मोठी बातमी! सेनाभवनसमोरच आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात, वेगाने येणाऱ्या बाईकस्वाराने दिली धडक

जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार?; जयंत पाटलांच्या ट्विटमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; म्हणाले मला स्वतःला…