Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…त्यामुळे फडणवीस…

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…त्यामुळे फडणवीस…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती. आमचं सरकार स्थापन होणार होतं. त्यासाठी शरद पवार यांनीही पुढाकार घेतला होता. पण नंतर शरद पवार यांनी डबल गेम केला. त्यामुळे आम्हाला पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावरून आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, शरद पवारांनी आमचा…

फडणवीस यांच्याकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. त्यांचं सरकार औटघटकेचं आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेण्यालसाठी दिलेल्या मुदतीचा अर्धा काळ गेला आहे. हे सरकार पडतंय. त्यामुळे फडणवीस झोपेत बडबडत असतील किंवा जागेपणी बडबडत असतील. त्याकडे फार लक्ष देऊ नका, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान शरद पवारांनी काही गोष्टी केल्या असतील तर ठिक आहे. त्यात नवीन काय? काय केलं पवार साहेबांनी? तुम्ही प्रयोग केला तुमचा प्रयोग फसला. ही एका ओळीची गोष्ट आहे. तुमचा प्रयोग तुमच्या अंगलट आला. लोकांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ते मीडियाशी संवाद साधत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

‘या’ निवडणूकीत काँग्रेसच्या मदतीने भाजप नेत्याने भाजपला केलं पराभूत, नेमकी खलबतं काय?

…अन् दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ‘ती’ चूक मान्य केली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

मोठी बातमी! सेनाभवनसमोरच आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात, वेगाने येणाऱ्या बाईकस्वाराने दिली धडक