Home महत्वाच्या बातम्या शरद पवारांनी भाजप-राष्ट्रवादीच्या संभाव्य सरकारचे पालकमंत्रीही ठरवले होते; भाजपच्या आणखी एका नेत्याचा...

शरद पवारांनी भाजप-राष्ट्रवादीच्या संभाव्य सरकारचे पालकमंत्रीही ठरवले होते; भाजपच्या आणखी एका नेत्याचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती. आमचं सरकार स्थापन होणार होतं. त्यासाठी शरद पवार यांनीही पुढाकार घेतला होता. पण नंतर शरद पवार यांनी डबल गेम केला. त्यामुळे आम्हाला पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर आता भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : अनेक राज्यांमध्ये भाजपचं…; शरद पवार यांची भाजपवर टीका

शरद पवारांनी आम्हाला धोका दिला ही गोष्ट खरी आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युतीचा निर्णय झाला होता. पवार साहेबांनी जिल्ह्यांचे पालकमंत्री सुद्धा ठरवले होते. त्यानंतर ते माघारी फिरले, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.. ते आज माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी आज जे काही सांगितले ते शंभर टक्के खरे आहे. शरद पवार यांचा जो काही राजकीय प्रवास आहे, इतिहास आहे, ते बघितले तर फडणवीस जे म्हणत आहेत ते खरे आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…त्यामुळे फडणवीस…

पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, शरद पवारांनी आमचा…

‘या’ निवडणूकीत काँग्रेसच्या मदतीने भाजप नेत्याने भाजपला केलं पराभूत, नेमकी खलबतं काय?