आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : झी मराठी या वाहिनीवर ‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये राज ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून दिसत आहेत.
या शोमध्ये बोलताना, राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
या शोमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज ठाकरे यांना काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे देत असताना राज ठाकरे भावूक झालेलेे दिसले.
ही बातमी पण वाचा : “आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचं निधन, मुंबईत सूरू होते उपचार”
या शोमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेला एक फोटोही यावेळी दाखवण्यात आला. यावर अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरेंना विचारलं की, काय वाटतंय सगळं एकत्र असं बघून? असा प्रश्न विचारताच राज यांनी भावूक होत उत्तर दिलं. खूप छान दिवस होते ते. काय माहित कुणी विष कालवलं. किंवा कुणाची नजर लागलीस असं उत्तर राज ठाकरेंनी यावेळी दिलं.
दरम्यान, त्यानंतर राज यांना गुप्तेंनी दुसरा प्रश्न विचारला. आता पुन्हा एकत्र येऊ शकत नाही? यावर राज यांनी, माहीत नाही. नशीबात असेल, तर येऊ. नियतीच्या मनात असेल, तर येऊ, असं राज यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
नाना पटोलेंच्या पोस्टर्सची राज्यभर चर्चा; भावी मुख्यमंत्री म्हणत उल्लेख