Home पुणे वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मोरेंनी स्पष्ट केली भूमिका,...

वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मोरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याचदरम्यान वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यासाठी अमित ठाकरे यांनी पुण्यात मोरेंना भेटीसाठी बोलावलं होतं. या भेटीनंतर वसंत मोरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हे ही वाचा  : 48 तास संपलेत, गेलात काय कर्नाटकात, की फक्त कर नाटक; शिंदे गटाचा, पवारांना टोला

मला काल अमित ठाकरेंचा, रात्री भेटण्यासाठी या असा फोन आला होता. आमच्यात 40 मिनिटं चर्चा झाली. तुमची बाजू जाणून घेण्यासाठी भेटायला बोलावलं असल्याचं मोरेंनी यावेळी सांगितलं. मी माझ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. आमच्या भेटीनंतर कोअर कमिटीलाही त्यांनी भेटीला बोलावलं आहे, अशी माहितीही वसंत मोरेंनी यावेळी दिली.

दरम्यान, मी माझी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही, राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवर क्लिप टाकली होती. त्यानंतर मी स्पष्ट केलं होतं. मला जायचं असतं तर मी कधीच गेलो असतो. मी पक्ष सोडणार, असं सांगितलेलं नाही. इतर पक्षातील लोक जर मला त्यांच्या पक्षात घेण्यास इच्छुक असतील तर यात माझी चूक नाही, असं म्हणत मोरेंनी राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांवर पूर्णविराम दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मी मिटिंगसाठी स्मशानात येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही; वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य

“आई-बाबा घरी नाहीत तू ये…; प्रेयसीनं बोलवताच प्रियकर गेला आणि त्याच्यासोबत जे घडलं ते…”

गुजरातच्या ऐतिहासिक विजयावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…