Home नागपूर महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडी होणार?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडी होणार?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर आता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील आता मैदानात उतरले असल्याचं पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेनं आता एकत्र लढायला हवं, काँग्रेससोबतही चर्चा करायला हवी., असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : मीरा-भाईंदरमधील ‘ते’ 11 नगरसेवक आजही उद्धव ठाकरेंसोबत; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

दरम्यान, माझं मत जरी असलं तरी आधी काँग्रेससोबत चर्चा करावी लागेल. तसंच आम्हांला शिवसेनेसोबतही चर्चा करावी लागेल. त्यांचं मत ते असलं तर चर्चा केली जाईल. या प्रश्नावर आम्ही तिघेही एकत्र बसून आणि यात शक्य झालं, तर एकत्र निर्णय घेऊ, असं सूचक विधान शरद पवारांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उपमुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; चर्चांना उधाण

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती

मंगळवेढामध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ निवडणूकीत समविचारी गटानं केली सत्ता स्थापन