Home देश कंगना भाजपमधून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्यं

कंगना भाजपमधून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्यं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आगामी काळात लोकसभा निवडणूक पार पडणार असून निवडणुकीची चाहूल आतापासूनच लागू लागली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा जागा चर्चेत आहे. इथून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत राजकीय कारकीर्द सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर भाजप उपाध्यक्ष गोविंद ठाकूर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

ही बातमी पण वाचा : भाजप म्हणते ‘हिंदू खतरे में’ तर मग तुम्ही…; प्रकाश आंबेडकरांची भाजपावर टीका

गोविंद ठाकूर हे एका मंदिराच्या वार्षिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी कंगना रनौत आगामी निवडणूक लढणार का? असे विचारले असता भाजप उपाध्यक्षांनी हे सूचक विधान केलं आहे.

कंगनाने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणे ही अंतर्गत बाब आहे आणि पक्ष तिला तिकीट देईल की नाही हे फक्त भाजपचे वरिष्ठ ठरवू शकतात. खरं तर कंगना मंडी जिल्ह्यातील भांबला येथील रहिवासी आहे आणि तिने इथे घर देखील बांधले आहे, असं गोविंद ठाकूर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या भावाला ईडीकडून समन्स”

अमित शहांनी वचन पाळलं असतं, तर देवेंद्र फडणवीस…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले…