Home देश अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का?; यावर शरद पवार हसून म्हणाले…

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का?; यावर शरद पवार हसून म्हणाले…

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी केरळमध्ये काँग्रेसला रामराम ठोकलेले पी. सी. चाको यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? या प्रश्नावर बोलताना पवार हसले आणि ही नवीनच बातमी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

महाराष्ट्र सरकार योग्य काम करत आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.

सचिन वाझे प्रकरणावर बोलताना मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. कारण या प्रकरणात एक राष्ट्रीय यंत्रणा तपास करत आहे. त्यांना सहकार्य करणं, त्यांच्या कामात अडथळा येणार नाही, हे पाहणं आमचं काम आहे असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

भारत Vs इंग्लंड दुसरा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय

“कोरोना पाॅझिटिव्ह असूनही शूटिंगला गेली; अभिनेत्री गाैहर खानवर गुन्हा दाखल”

“भारत आणि इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा ‘हा’ एकमेव क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का?”

डियर शादी डाॅट काॅम…या मुलाला मुलगी शोधण्यासाठी मदत करा; नितेश राणेंचा वरूण सरदेसाईंना टोला