Home महाराष्ट्र एवढं मोठं बंड का केलं? ठाकरेंची साथ कशामुळे सोडली?; एकनाथ शिंदेंनी दिलं...

एवढं मोठं बंड का केलं? ठाकरेंची साथ कशामुळे सोडली?; एकनाथ शिंदेंनी दिलं पहिल्यांदाच उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेसोबत बंडखोरी कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यामुळे एकनाथ शिंदेंनी एवढं मोठं बंड कसं केलं?, उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा ट्रिगर पाँईंट कोणता होता?, यावर एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं आहे.

ट्रिगर पॉईंट विचारत असाल तर ट्रिगर रोजच दाबला जात होता. गोळी सुटायची आणि कोणीतरी शहीद व्हायचं. ही 50 लोकंच माझ्या मागे लागली होती,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हे ही वाचा : अमित शहा म्हणाले, उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, आता आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘2019 ला महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना युतीला कौल दिला होता. बाळासाहेब आणि मोदींचे फोटो लावून आम्ही निवडणूक लढलो. पण निवडणुकांनंतर महाविकासआघाडीचा प्रयोग झाला. हा प्रयोग आमच्यातल्या अनेक आमदारांना मान्य नव्हता, पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे कार्यकर्ते, त्यामुळे आम्ही नेतृत्वाचा निर्णय मान्य केला, असं शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मोठी बातमी! ठाकरे-शिंदेमध्ये पहिली लढत, ‘या’ निवडणूकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर”

“मोठी बातमी! अमित शहांसोबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या दर्शनासाठी जाणार नाहीत, चर्चांना उधाण”

…अन् राज ठाकरेंनी चाहत्यांची सेल्फीची इच्छा केली पूर्ण