Home महाराष्ट्र अमित शहा म्हणाले, उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, आता...

अमित शहा म्हणाले, उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, आता आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिल्याचा आरोप अमित शहांनी यावेळी केला. तसेच त्यांना या धोक्याची शिक्षा मिळाली पाहिजे, असं वक्तव्य अमित शहांनी यावेळी केलं. तसेच केवळ 2 जागांवरून शिवसेनेनं 2014 साली युती तोडली, असंही शहा म्हणाले. यावरून आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! ठाकरे-शिंदेमध्ये पहिली लढत, ‘या’ निवडणूकीसाठी मातोश्रीवरून उमेदवार जाहीर”

मी अमित शहा यांच्या वक्तव्यावर काहीही बोलू शकत नाही. जो खरा कट रचला गेला होता तो लोकांसमोर येत आहे. मी त्यांच्यावर तर काही बोलणार नाही. मात्र, माझी प्रतिक्रिया घेण्याआधी आमच्या मनात प्रेम आणि आदर असणाऱ्या 40 लोकांची पहिली प्रतिक्रिया घेतली पाहिजे., असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

दरम्यान, प्रत्येक गोष्टीवर कुठं बोलायचं. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, मुंबईकर आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला सांभाळून घेत आहे. आमच्यासोबत आहे आणि आम्हाला एकटं पडू देणार नाही ही खात्री आहे., असं आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मोठी बातमी! अमित शहांसोबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या दर्शनासाठी जाणार नाहीत, चर्चांना उधाण”

…अन् राज ठाकरेंनी चाहत्यांची सेल्फीची इच्छा केली पूर्ण

शिंदे गटाचा राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यासह हजार पदाधिकारी-कार्यकर्ते उद्या शिंदे गटात